भारत संचार निगम लि.च्या वतीने दिवाळीनिमित्त त्यांच्या ग्राहकांसाठी एक मोफत ऑनलाईन सुविधा देण्यात आली.ही सुविधा पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्या गोवा शाखेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
त्या संबंधी एका मुलीने मला फोन केला.
"सर मी BSNL मधनं बोलते आहे ,जर तुमच्याजवळ थोडा वेळ असेल तर मी बोलू शकते?"
बोला.
"सर आमच्याकडे दिवाळीनिमित्त एक ऑफर आहे"
कश्याबद्दल.{मी थोडे कष्ट घेऊनच बोलत होतो.}
"एक नवीन गेमिंग झोन आलाय एकदम फ्री"
एकदम फ्री.
"हो पण एक महिन्यासाठी".
त्यानंतर.
"आपल्याला सबक्रीप्शन वाढवून घ्यावे लागेल,त्याचे चार्जेस वेगळे लागतील."
नको नको.ह्या फालतू भानगडी नको.
"सर ऐकून तर घ्या.अपलोड करा आणि मग एक महिन्याआधी रद्द करा ना."
तीच कामं आहेत का?
"सर प्लीज ट्राय तर करा."प्लीज........
"हवं तर उद्या रद्द करा पण.........
हे साधारण पाच मि.चे बोलणे.पण त्या पाच मिनिटांच्या बोलण्यानेच मी भाळून गेलो.तिचा प्रत्येक शब्द मी लक्षपूर्वक ऐकत होतो आणि नाही म्हणता म्हणता मी गेमिंग झोन अपलोड करायला राजी झालो.
तिचा आवाज इतका गोड होता की तिला ऐकतच राहावे.मग गेमिंग झोन अपलोड करण्याची प्रोसेस सुरू झाली.
"सर पहिले BSNL ची वेबसाईट ओपन करा."
एक मि.तू मला हे सर म्हणणं आधी थांबव.
"ओके सर."
अरे पुन्हा.......
"नाही नाही सॉरी."
आत्ता बोल.साधारण किती वेळ लागेल याला.
"तुमच्या नेट स्पीड वर अवलंबून आहे."
तरी.
"कुठे कुठे पंधरा मि.तर कुठे एक तास सुद्धा लागतो."
अरे व्वा मला एक तासच हवा होता.{मि मनात म्हटले.}
मग अपलोडिंग करता करता इकडचे-तिकडचे प्रश्न मी तिला विचारू लागलो आणि तीसुद्धा छान रित्या{प्रेमाने}
त्यांची उत्तरे देत होती.
बोलता बोलता लक्षात आलं.......अर्रे आपण तर इचे नाव विचारलेच नाही.
तुझं नाव काय गं?मी म्हणालो.
"अदा."
तुम्ही कधी खरं बोलला का?
"नाही रे खर्रच."
आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये असं नाव ठेवतात का?
"मी मुस्लीम आहे."
काय?
"हो त्यात नवल काय?"
नाही नवल नाही काही.पण इतकं सुंदर मराठी कसं काय बोलतेस?
"मी चिपळूणची...............जन्मापासून"
अच्छा.म्हणजे तू खरी कोंकणी तर..........
"होय."
मग गोव्यात?
"अरे शिक्षण चालु आहे आणि पार्ट टाईम जॉब."
"झालाय का अपलोड?"तिने अचानक विचारलं.
मी एकदम थबकलो.नाही थोडं व्हायचंय.का तुला घाई आहे का?
"मला कसली घाई?माझा जॉबच आहे तो."
मग कितीही वेळ बोललं तर चालतं का?
"हो पैसे BSNL चं देतो ना!"
असं संभाषण कमीत कमी मी पाऊण ते एक तास चालवलं......................
तिच्याशी बोलणं सोडण्याची infact तोडण्याची इछाच नव्हती.
माहीत नाही का बरं?पण कदाचित मी तिच्या बोलण्याच्या प्रेमात पडलो होतो.
खूप सुंदर बोलायची ती.
मग नकळत मी तिला म्हणालो.झालं अपलोड आत्ता काय?
"आत्ता काही नाही एन्जोय......."
"आणि जर तुम्हाला सबक्रीप्शन रद्द करायचं असेल तर आमचा टोल फ्री नं.दिला आहे,त्यावर फोन करायचा."
फोन केल्यावर तूच भेटशील ना?
माझा एक प्रांजळ प्रश्न.
"नाही रे.इथे भरपूर एम्पलोइज आहेत.कोणीही भेटू शकतं."बाय......य्य्य्यय्य्य्य.........
तिचं मिश्कील उत्तर.......................
No comments:
Post a Comment